एक रात्र पावसाची
एक रात्र पावसाची अन एक प्रवास मैत्रीचा
एकमेकासोबत चिंब भिजून भेटण्याचा
एक भेट अविस्मरणीय , एक गोष्ट डोळ्यांची
एक क्षण हरवलेला अन एक क्षण भारावलेला
एक ओळख हरवलेली अन एक नवी ओळख पटलेली
एक रात्र कधी ही न संपणारी, अन एक पाउस कधीच न थांबणारा
एक क्षण, एक प्रवास संपण्याची हुरहूर अन हळूच एका नव्या प्रवासाची चाहूल
एक अनामिक दाटलेली हुरहूर अन दोन डोळ्यात दाटल्येल्या अश्रूंची मनास पडली भूल
एक नाते विश्वासाचे अन एक बंधन आयुष्याचे
एक पाउस तू , मला अन सागराला ही चिंब करणारा
अन एक पाउस दोघांच्या ही मनात सदाच बरसात गाणारा
- शीतल जोशी
No comments:
Post a Comment