सहजच लिहिता लिहिता
सहजच लिहिता लिहिता
शब्दांचे काव्य जाहले
असेच गुणगुणताना
कवितेतून गीत पाझरले
शब्द तेच होते ओठी
अन मी हि तीच होते
तुझ्याशी जुळता रेशीम गाठी
त्याच शब्दांना नवे अर्थ लाभले
सगळे काही तेच आहे
तरी सारेच नवे भासते
सृष्टी जरी एकच जरी
तरी नव्या ऋतूचे रूप ल्याते
कसली तरी किमया होते खरी
अन हुरहूर अनामिक दाटे उरी
प्रीतीने मन आभाळ भरून येता
मायेच्या हळव्या सरीवर सरी
सहजच आयुष्य जगता जगता
आयुष्याचे नव्याने अर्थ कळाले
सहजच वाटे वरून मार्ग क्रमिता
सुहृदाचे प्रेम गवसले
-शीतल
No comments:
Post a Comment