तुझे माझे नाते
बावरलेली मी अन सावरणारा तू
स्वतःलाच हरवून बसलेली मी
अन मलाच माझा शोध लावून देणारा तू
सदाचीच भविष्यात रमणारी मी अन
भविष्य साठी वर्तमानात झगडणारा तू
तुझ्यात माझे अस्तीस्त्व सामावून टाकणारी मी
अन माझी अस्मिता माझ्यासाठीच जपणारा तू
तुझ्या शिवाय नाही जगत येणारा असा विचार करणारी मी
अन केवळ एकमेकासोबत जगायचा असा विश्वास बाळगणारा तू
तू जवळ नसताना सुद्धा तुझ्या डोळ्यांच्या आठवणी मध्ये रममाण मी
अन मी समोर असताना माझे मन माझ्या डोळ्यात वाचणारा तू
ज्या वेळी कोसळलेली मी, त्या क्षणी सांभाळणारा तू
ज्या क्षणी कमजोर तू, त्या क्षणी खंबीर मी
तुझे माझे नाते कधी उसळणाऱ्या सागरसारखे
तुझे माझे नाते कधी संथ, शांत सरिते सारखे
- शीतल जोशी
No comments:
Post a Comment