कृष्ण सखा
मीरेचा तू कृष्ण सखा, तर आणीकही कुणासाठी भगवान तू
देवकीचा कान्हा तर राधेचा मनमोहन तू
पण कोणी कधीच न वदले, मज, रूक्मिणी साठी आहेस कोण तू
मग स्वये रुक्मिणीच वदे, कि माझ्यासाठी कोण तू ,.............
माझ्यासाठी तर ......
चिंब करणारा आषाढाचा, पहिला वहिला मेघ तू
लखलखणारी विजेची तेजोमय रेघ तू
किनाऱ्यावर झेपावणारी बेधुंद सागर लाट तू
घनगंभीर काळोखातील रविकिरणाची वाट तू
रिमझिम रिमझिम श्रावण सरीमधील गारवा तू
मनमुक्त गाणाऱ्या कोकिल तानेतील मारवा तू
तप्त रेतीमधील मृगजळाचा भास तू
क्षितीज्या पल्याडच्या स्वर्ग सुखच आभास तू
राधेचा जिवलग सखा अन मीरेचा ध्यास तू
रूक्मिणी साठी मात्र क्षण अन क्षणाचा श्वास तू
- शीतल जोशी
No comments:
Post a Comment