लहान पण देगा देवा !!!!
किती वर्षे झाली, दप्तर भरले नाही
किती दिवस झाले मधली सुट्टी पण मिळाली नाही
लहान सुट्टी मध्ये डबा संपून, मोठ्या सुट्टीमध्ये लगोरी पण लावली नाही
बरेच दिवस झालेत, प्राथर्ना म्हणण्यासाठी हात जोडून
अन प्रतिज्ञा तर आता केवळ आठवणी मधेच राहिलेय
मागे वळून पाहताना थोडे, शाळेची घन्टा ऐकू येतीये
आता शाळा भरेल असे वाटे पर्यंत आठवणीची रेती हातामधून निसटून जातीये
घरचा अभ्यास आणि गृहपाठ नावाचा एक छळवाद होता
तरी सुद्धा प्रत्येक दिवस किती आनंदात जात होता
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण सुख सापडत होते
आणि जगण्यासाठी आपले गणगोत आणि सुहृद पुरेसे आहेत ह्याचे हि कौतुक होते
खेळत लबाडी केली तरी, मैत्री मध्ये निरागसता होती
अगदी एक cadboury सुद्धा सात जणांमध्ये पुरत होती
आपल्या बालपण मध्ये , आई वडील त्यांचे बालपण शोधत होते
"मला जे नाही मिळाले, ते तुम्हाला मिळू दे" , या साठीच झगडत होते
बघता बघत , बालवाडी संपली, प्राथमिक , माध्यमिक अन महविद्यालय पण झाले
इतक्या वर्षात, खरच कधी मागे वळून सुद्धा नाही पहिले
तरी आज पुन्हा भूतकाळात डोकावताना,
शाळेची इमारत अजून हि आठवतीय, मित्र-मैत्रिणीच्या घोळक्यात खिदळणारे आपण हि दिसतोय हसताना
ज्या वळणावर सगळ्यांच्या वाटा निराळ्या झाल्या, तिथेच मन अडकून राहलय अजून हि मागे वळून पाहताना
छान होते बालपण माझे, आई बाबा, भाऊ बहिण सगळ्यासाठी वेळ होता
शाळा, मित्र मैत्रिणी, माझे शिक्षक इतके छोटे पण सुंदर जग होते माझे
तसे तर आयुष्य अजून हि सुंदर आहे, नवे जग, नवी नाती , थोडे त्रास हि आहेतच कि
पण तरी सुद्धा जिथे तुकोबाला सुधा ज्या लहानपणचा मोह सुटला नाही, तो आपल्या तरी का सुटेल
आज परत प्रार्थना म्हणावी लागली, तर लहानपणच मागू आपण
देव असेलच तर म्हणेल अरे मी पण नाही का बाळकृष्णाचा, गीता सांगणारा कृष्ण झालो
नियती आणि वेळ कधीच चुकत नाही आणि कुणासाठीच थांबत नाही
म्हणूनच कदाचित, साठवण हि बालपणाची जपू शकतो आपण
थोडे निरागसतेने आयुष्याकडे पाहू या पुन्हा
अन साठवू यात मनात आपल्या बालपणाची आठवण
-शीतल

No comments:
Post a Comment