जगावे कसे?
पावसाला कुठे ठावूक असतं, मी बरसणार आहे म्हणून
कळीला कुठे ठावूक असतं, मी उमलणार आहे म्हणून
आंब्याला कुठे ठावूक असतं, मी मोहोरणार आहे म्हणून
ऋतूला कुठे ठावूक असतं, मी बहरणार आहे म्हणून
क्षणाला कुठे ठावूक असतं, मी जाणार आहे म्हणून
आयुष्याला कुठे ठावूक असतं, मी संपणार आहे म्हणून
म्हणूनच
अगदी मनापासून उमलावं
अगदी मनापासून बहरावं
अगदी मनापासून जगावं
असं आयुष्य जगावं कि
कधीतरी संपणारया आयुष्यालाही
जगण्याचा मोह पडावा
प्रत्येक क्षणावर प्रेम करण्या इतका
आयुष्याचा आपल्याशी स्नेह जडावा
- शीतल जोशी

No comments:
Post a Comment