सूर जगलो मी
सूर जगलो मी , सुरेल झाले श्वास हि माझे
सप्तसुरांचा नादब्रम्ह साऱ्या विश्वात वाजे
सृष्टी सारी बहरून जाई अन
वसंत सुरांनी मोहरूनी गाई
आला हा वसंत सुरांचा
जणू अंश हा शारदेचा
वसुधे वर उतरुनी आला
रसिका स तृप्त करुनी गेला
पंडित वसंत राव देशपांडे यांच्या स्मृतीस वंदन !!!
- शीतल
No comments:
Post a Comment