Saturday, 24 September 2016

स्वातंत्र्यवीर

स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सूर्य
असे म्हणत असताना
आम्ही या स्वातंत्र्याची किंमत केली नाही
तुमचा पराभव करायला
जुलमी ब्रिटिश राजवट हि
अक्षरश: कमी पडली
अत्यंत प्रखर , प्रगल्भ आणि
पराकोटीचा देशभक्त म्हणून
त्यांनी तुमचं अस्तित्व मान्य केले
पण आम्ही आप्त स्वकीयांनीच
तुमचा सगळ्यात मोठा पराभव केला
तुम्हाला काय म्हणायचं आहे
याचा कणभर हि अभ्यास न करता
तुमच्या वर कसले ना कसले शिक्के
मारून आम्ही तुमचा आणि पर्यायाने देशाचा
सगळ्यात मोठा पराभव केला आहे
आम्ही तुम्हाला साहित्यिक म्हणून
अनुभवले नाही, तुमचं साहित्य समजून
घेण्याची कुवत आजही आमचं शिक्षण
आम्हाला देऊ शकत नाही
विज्ञानाची कास धरणे तर सोडूनच द्या
आम्ही आजही त्याच कर्म कांडाच्या
चौकटीत इतके पक्के अडकलो अहोत
कि आम्ही आता त्यांनाच संस्कृती म्हणतो
काळ्या पाण्याची शिक्षा तर
फारच दूरची झाली हो
साधे सिग्नल पाळणे हि सुद्धा आम्हाला
शिक्षा वाटते
कर भरले कि आपण देशसेवा करतो
या भ्रमात आम्ही जगतो
मग ने मजसी ने मधली
मातृ भूमीची ओढ कशी कळेल आम्हाला
आयुष्यभर देशप्रेम हाच संसार मानणाऱ्या
कोणताच जातीभेद न मानता सामाजिक कार्य करणाऱ्या
बुद्धिनिष्ठ आणि परखड पणे सर्वच धर्मातील अंधश्रद्धा वर फटकारे मारणाऱ्या
परकीय राजवटीला ज्यांची सतत धास्ती वाटत होती
अश्या एका एकमेव अद्वितीय नेत्याला
आम्ही "हिंदुत्ववादी" असा ठप्पा मारून
अडगळीत टाकून दिले
इतकी अवहेलना तर परकियांनी हि नाही केली
वर्षातून एखादा दिवस जरी
तुमच्या स्मृतीं वरची धूळ झटकली
मनाची कवाडे खुली करून
तुमचा एक जरी विचार समजून घेऊन
कृतीमध्ये आणला तरी
सार्थक होईल जीवनाचे आमच्या
अखंड विज्ञान आणि देशप्रेम यांची
ज्योत तेवत ठेवण्याऱ्या
स्वातंत्र्य सूर्याला
आमच्या सारख्या काजव्यांचे
शतश: नमन
-शीतल जोशी

#swatantraveer #ViDaSawarakar #marathikavita #marathiblogs #सावरकर #स्वातंत्र्यवीर

भिगे लम्हे

बारिश क्या हुई
मौसम ने करवट बदली
मै मै ना रही, तुम तुम ना रहे
कुछ गिली यादों में नजाने कहा
हम खो गये
काले घने बादल थोडे मन पे छा गये
और कुछ बुंदे बारिश कि
आँखो में सिमट गयी
बारीशे कितनी ना जाने
कही सारे पल बह के ले गयी
बस बह ना सके हम
तुम्हारे तरह वक्त के साथ
फिर बारिश आयेगी, नाचेंगी गाएगी
मेरे अंगने में मिट्टी कि खुशबू खिलखीलयेगी
और मैं खडी रहूँगी उसी खिडकी में
राह देखते हुए उस बारिश कि
जो तुम्हे भी थोडा गिला कर दे
मेरे साथ, कुछ भिगे लमहो में
-शीतल


बारीशे

कई अरमान उतरे है आसमान से
धरती पर, बारिश कि बुंदे कि साथ
कई ख्वाब देखे अनदेखे से जैसे
उतरे आंखोसे सीधा रूह मे


गिलासा मन, भिगेसे पल कई
समेट लिये है दामन मे
डर लगता है कही
ख्वाब ख्वाब ना रह जाये
और अरमान भी बह जाये

बरसात के पानी मी
न छुट जाए ये लम्हे भी
दामन में जो थाम के रखे है

ना धुंदला जाये यादे इन पलों कि इतनी
कि मै भूल बैठु माँ का वो ममता का एहसास
डर लागता है कि कही खो ना जाऊ मैं भी
उस चांद कि तरह जो खोया है अंधेरे घने बादलो मे

पर फिर याद आती है वो मिट्टी कि खुशबू
जो मन महका देता है, और रूह जाग उठती है
फिर महसूस होती है माँ कि वो खुशबू
जहन में जो बस गयी है सालों से

और बताती रहती है कि
देखा कर ख्वाब बिना किसी खौफ के
नही बह जायेंगे अरमान, बरसात में

ना मेरा एहसास और ना तुम खो जायोगी कही
बरसने दो बारीशे कई, अरमान उनके साथ
मैंने खोली है मेरी बाहे उन्हें समेटने के लिए
-शीतल

#hindikavita #hindpoem #blogs

पाऊल वाट

रोजचीच वाट पायाखालची
अन आज मात्र चकवा देऊन गेली
वर्षा नु वर्षा ची ओळख असून पण
आज जरा नवीनच भासली
मी आपल्याच नादात
तिला रोज तुडवत होते
आपलंच सुख दुःख कुरवाळत
माझ्याच कोशात गुरफटत होते
आज मात्र सारेच नवं नवं वाटत होते
पहिल्या वहिल्या प्रेमात पडावं तसे
जणू इवलीशी वाट ती सजली होती
हिरव्यगार पात्यांनी वेढेली होती
निसरडी झाली असूनही
मला आज सावरत होती
ती आज जणू माझ्याशी
चक्क गुजगोष्टी करत होती
अग कित्ती वर्षे झाली
मी रोजच सावरते तुला
पण तू आपल्याच नादात
कधी तरी कवाडे मोकळी कर मनाची
डोळे उघड आणि बघ आजूबाजूला
जगणे किती सुंदर आहे
वाऱ्याने हेलावून सुद्धा
तग धरणारी हि गवतफुले सांगतील तुला
पाय घट्ट रोवून कसे उभे राहायचं ते
आजूबाजूची झाडे फुले पाने
बदलेले ऋतू आणि त्यातही
स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची धडपड
सहज शिकवतील तुला
आणि मी, मी हेच सांगेन
कि रोज तीच मी अन तीच तू
पण म्हणून मी कंटाळत नाही
क्षितिजापर्यंत पसरलेले
निळे जांभळे आभाळ रोज
नवच वाटते मला
नवे रोज काही घडत नाही
म्हणून उदास नको होऊ बाई
त्या पेक्षा मनचक्षु उघडून
शोध स्वताच्यात च नवी नवलाई
शीतल
#marathipoem #marathikavita #marathiblogs

प्रतिबिंब

पाण्यातले पाहता प्रतिबिंब
उठले विचाराचे मोहोळ
वाटलं क्षणभर आपलीच
आहे ना हि तसबीर
जलतरंगा सोबत लहरणारी

पाण्या सारखे निर्मळ वाहत
राहता येते का खरच आयुष्यात
अगदी ज्या रंगात मिसळून जावे
अन तरीसुद्धा
जीवन म्हणून आपले अस्तित्व जपावे

उगाच सायंकाळी या तळ्याकाठी
बसतो मी एकटाच मग्न स्वतामध्येच
आणि शोधत राहतो स्वतालाच या खोल डोहामध्ये

खरं तर पाण्यात क्षणात दिसणारे
आणि विरणारे प्रतिबिंब
सांगताय मला कि इतका विचार नको करू
फक्त प्रवाह सोबत वाहत राहा

कारण आयुष्य असाच आहे क्षणभंगुर
मन आनंदी तर प्रतिबिंब हि तसेच दिसेल तुला
अन मग येत राहशील माझ्याकडे तेच पाहायला
न बोलणारा तू अन अबोल मी
सारे काही बोलेल हे प्रतिबिंब
तुला आणि मला जोडणारे

-शीतल
#marathikavita #marathipoem #marathiblogs

किताब

घर में एक खास जगह होती है ना
भगवान कि पूजा के लिये
तो फिर क्यो ना हि इक छोटसा कोना हि सही
कुछ चंद किताबो के लिये
भगवान के सामने जलाया हुआ दिया
हलकी हि सही पर एक किरन दिखता है आशा कि
वैसे हि कितोबो से सजा हुआ ये एक कोना
रोशन करेगा जिंदगी, कई मायनो में
ग्यान के या एहासासो के हि मायने सही
जैसे होती हैं ना एक जगह दिल में
खास दोस्तो के लिये
आयो वैसे हि एक स्पेस बनाये
इन दोस्तो के लिये, उम्र भर के लिये
माना कि किताबे भले हि है
बेजूबान और बेजना सही
मगर कितने सरो कहानिया और दास्ता
है समिटी इस में, कई सारी जाने और
जिंदगीया भी
ये साथ हमारा इन किताबो कर साथ
ये नाही एक पल का या दिन का
अगर जुडे ये रिश्ता इन से
तो ये साथ हो जाये जीवन भर का
-शीतल
#hindikavita

मनातला पाऊस


कधी रिमझिम, कधी तुफान
कधी एखादी सर, कधी एखादाच थेंब
तळहातावर झेलेलेला, मोत्यापरी
अन मनात मात्र तुझ्या आठवणीच्या
चिंब चिंब सरी

एक पाऊस आसमंत भिजवणारा
आणि माझ्याच मनातला पाऊस
काही ओले क्षण जपणारा
आठवतो का रे तो पाऊस

पूर्ण संध्याकाळ कोसळत होता
वेड्या सारखा, रपरपत
आणि आपण हि वेड्या सारखे
प्रेम करत होतो त्या पावसावर
अन एकमेकांवर हि पण अव्यक्त

बेभान पाऊस अन बेभान मन
बोलू कि न बोलू या जाणिवेने
बेचैन, अस्वस्थ झालेलं मन
काय माहित काय झाले
बाहेरचा पाऊस
डोळ्यात उतरला
अन सारे सारे काही उमजले
शब्दाविना

त्या नंतर किती तरी वेळा
पाऊस असा बरसला
पण जसा त्या वेळी चिंब
करून गेला, तो बस एकदाच
आठवतो का रे तो पाऊस
काही भिजलेला क्षण जपणारा

शीतल
#marathikavita #marathipoem #paus #pavusanikavita #pavasavarachikavita #marathiblogs

कश्म - कश्म

ना जाने क्यों ये कश्म कश्म है
न जाने कैसी ये उलझन है
जितना मैं सुलझाना चाहू
रिश्ते और उलझते है
मैं तो बस सोचती हूं
जिंदगी बडी सिधी है
लोग इसे क्यों बनाते हो खाम खा
इतना मुश्किल हर वक्त इसको
मुट्ठी मे कैद करे के हर इक पल को
और
हर इक रिश्ते को कोई नाम देकर
बस जिले वही पल जो आज है
फिर इतनी मुश्किल नही
उलझन कोई
-शीतल

#hindikavita #hindipoem #हिंदीकविता #shabdasarita #sheetaljoshi #blogs

अकेलपन

हम तनहा तो नही
बस थोडा अकेलपन है
दिन तो कट जाता है
झिंदगी के झमेलो मै
बस रातो में खालीपन है
खफा नही हम जिंदगी से
बस कोई मनाए कभी कभी
ये बेवाकूफसी ख्वाईश है
आँखो में खुशिया झलके
इस कोशिश में कभी थक जाऊ तो
बस रोने कि हिम्मत कर सकू
इतनी हि चाहत है
-शीतल
#हिंदीकविता #shabdasaritamazikavita

कहानी

दो चार हि शब्दो में खत्म हो
ऐसी कोई कहानी है तो बताओ
या फिर मै ये कह दु कि
जिंदगी कि कोई दास्ता नही होती
जो शुरू और खत्म हो
कही ना कही
ये तो बस इक सफर है,
ना है मंज़िल कोई पता
ना जानू मैं कोई रास्ता
बस चलते जाना है युही
दिल में मोहब्बत लिये
गिलें शिकवे छोडकर
इसके हर इक मोडपर
ना कोई कहानी बनेगी
ना को अफसना बनेगा
बस उलझ जायेंगे हम
कुछ अनकहे अल्फाजो में
और पहोच जायेंगे कही ना कही
जीवन के इस सफर में
शीतल
#blogs #hindipoetry #hindpoems #sheetaljoshi

गोष्ट माझी साधीच

गोष्ट माझी साधीच
कथा बिथा नाही हं
सोपीच आहे अगदी
आला दिवस माझा म्हणायचे
आणि तो मिळाला याच आनंदात जगायचे
पोटापाण्याची सोय आहे म्हणून
नोकरी धंद्याचे झंझट आहे
पण ते आहे म्हणूनच
रोटी कपडा मकान हि आहे
रंग दिसतात मला
सूर ऐकू येतात मला
शब्द गळ्यातून उमटतात माझ्या
हात पाय जागच्या जागी
अन डोके सुद्धा आहे बरं
अगदी जागच्या जागी
प्रेम करणारी आपली अशी
थोडीच का होईना माणसे आहेत आजूबाजूला
रसिक कुटुंबाचा सहवास आहे
या साऱ्यांच्या साथीला
अजून काय लागत हो
थोडेसे का होईना
हसू ओठावर सजवायला
अन थोडे हसू आजूबाजूला वाटायला
कटकटी, भांडणे, ट्रॅफिक, गर्दी
खोकला ताप व्हायरल अन सर्दी
प्रदूषण राजकारण
अन आवाजाची कलकल
रोजचच कि सारे माझ्या तुमच्या आयुष्यात
म्हणून का अडकून पडायचे त्याच त्याच चक्रव्यूहात
अगदीच काही माझी ओंजळ नाही रिती
रोज उठून उद्या काय याची पोटी नाही भीती
मी-माझ्यातून बाहेर पडले
कि आजूबाजूचा संघर्ष दिसतो
रोजच्या जगण्याचा त्यांचा
जे झगडतात रोज जगण्यासाठी
अन मग त्याच्या जगण्याची, कथा होते
अन माझी गोष्ट साधीच आहे
याची मला जाणीव होते
- शीतल
#marathikavita #marathipoem #marathipoetry #Blogs #marathiblogs #sheetaljoshi

ति

तिचे मन खूप मोठे
म्हणून तो साऱ्या चुकांसोबत
तिच्यात सामावून गेला
अन त्याला गवसला जगण्याचा सूर
अन तिचे विश्व ,त्याच्या भोवती ,खूप छोटे
म्हणून ती मात्र एकटीच राहिली
त्याच्या महत्वाकांक्षी वर्तुळाच्या
कक्षेइपासून कैक योजने दूर
-शीतल

Saturday, 18 June 2016

एक वाट रोजचीच

रोजचीच वाट पायाखालची
अन आज मात्र चकवा देऊन गेली
वर्षा नु वर्षा ची ओळख असून पण
आज जरा नवीनच भासली
मी आपल्याच नादात
 तिला रोज तुडवत होते
आपलंच सुख दुःख कुरवाळत
माझ्याच कोशात गुरफटत होते

आज मात्र सारेच नवं नवं वाटत होते
पहिल्या वहिल्या प्रेमात पडावं तसे
जणू इवलीशी वाट ती सजली होती
हिरव्यगार पात्यांनी वेढेली होती

निसरडी झाली असूनही
मला आज सावरत होती
ती आज जणू माझ्याशी
चक्क गुजगोष्टी करत होती

अग कित्ती वर्षे झाली
मी रोजच सावरते तुला
पण तू आपल्याच नादात
कधी तरी कवाडे मोकळी कर मनाची

डोळे उघड आणि बघ आजूबाजूला
जगणे किती सुंदर आहे
वाऱ्याने हेलावून सुद्धा
तग धरणारी हि गवतफुले सांगतील तुला
पाय घट्ट रोवून कसे उभे राहायचं ते

आजूबाजूची झाडे फुले पाने
बदलेले ऋतू आणि त्यातही
स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची धडपड
सहज शिकवतील तुला

आणि मी, मी हेच सांगेन
कि रोज  तीच मी अन तीच तू
पण म्हणून मी कंटाळत नाही
क्षितिजापर्यंत पसरलेले
निळे जांभळे आभाळ रोज
नवच वाटते मला

नवे रोज काही घडत नाही
म्हणून उदास नको होऊ बाई
त्या पेक्षा मनचक्षु उघडून
शोध स्वताच्यात च नवी नवलाई

शीतल

Wednesday, 1 June 2016

पहिली बारिश

बारिश क्या हुई
मौसम ने करवट बदली
मै मै ना रही, तुम तुम ना रहे
कुछ गिली यादों में नजाने कहा
हम खो गये

काले घने बादल थोडे मन पे छा गये
और कुछ बुंदे बारिश कि
आँखो में सिमट गयी

बारीशे कितनी ना जाने
कही सारे पल बह के ले गयी
बस बह ना सके हम
तुम्हारे तरह वक्त के साथ

फिर बारिश आयेगी, नाचेंगी गाएगी
मेरे अंगने में  मिट्टी कि खुशबू खिलखीलयेगी
और मैं खडी रहूँगी उसी खिडकी में
राह देखते हुए उस बारिश कि
जो तुम्हे भी थोडा गिला कर दे
मेरे साथ, कुछ भिगे लमहो में

-शीतल

Thursday, 26 May 2016

कृष्ण सखा

कृष्ण सखा

अर्जुन झालाय माझा
म्हणून कृष्ण शोधतोय  मी एक
एक सखा जो परखड असेल
जो खंबीर पणे  उभा राहील
माझ्या संकटात माझ्या समवेत

माझा आनंद त्याच्या हास्यात उमटेल
आणि माझे दु:ख त्याच्या बासरीच्या सुरात उमटेल
त्याच्यात आणि माझ्यात अंतर असेल कैक मैलांचे
पण तरीही तो  गाठेल हे अंतर प्रकाश वेगाने

मला नको आहे देवत्वाचा अंश असणारा कृष्ण
न मला त्याची पूजा करायची आहे, संकटे येवूच नयेत म्हणून
मला तो केवळ एक सुहृद म्हणून हवाय , ज्याचा  मीही एक मित्र होवू शकेन
मला जो केवळ योग्य मार्ग दाखवेल आणि कधी गरज पडलीच तर माझी मैत्री हि पाराखेल


सापडेल का असा तो कृष्ण सखा
कि आहेच इथे कुठेतरी , दिसून न दिसल्या सारखा

कदाचित माझ्यातच  कुठे तरी
केवळ मी मनापासून साद घालायची वाट पाहतोय
माझा कृष्ण सखा , माझ्याच मनातला

- शीतल

Friday, 18 March 2016

बऱ्याच दिवसात काही लिहिलच नाही

बऱ्याच  दिवसात काही लिहिलच नाही 
कस बर लिहिणार, लिहायला काही सुचलच नाही 

सुचण्यासाठी काही तरी घडावं लागतं 
झाडच एखादे  पण तरी गळावे लागतं 
अचानक पावसानी गाठावे लागतं 
कुणीतरी कुणाच्या तरी प्रेमात तरी पडावे लागतं 

आजू बाजूला बराच काही दिसत असते 
म्हंटले  तर बराच काही घडत असते 
कधी मोर्चे, तोड फोड, काही नाही तरी ट्राफिक जाम 
कारण कुणाचे तरी काही तरी अडत असते 
आणि म्हणूनच हे सारे हि घडत असते 

मग का बर आपल्याला काही सुद्धा सुचत नाही 
आजू बाजूला काय चाललय तेच मुली काळात नाही 
आणि कळले तर जर सुद्धा वळत नाही 

या सगळ्या गोंधळात सारे शब्दच जणू हरवलेत 
डोळ्या देखत काय माहित सारे कुणी पळवलेत 
सृजनशी त्यांचे नाते जणू काही विसरलेत 

किती जरी शोधले तरी शब्द काही मिळत नाहीत 
कसे बरे लिहावे हे सारे तेच आता  काळात नाही 

म्हणूनच, म्हणूनच 
बऱ्याच दिवसात काही सुद्धा लिहिले नाही 
मनात खूप असले तरी, मुळीच काही सुचले नाही  

- शीतल जोशी