Saturday, 24 September 2016

प्रतिबिंब

पाण्यातले पाहता प्रतिबिंब
उठले विचाराचे मोहोळ
वाटलं क्षणभर आपलीच
आहे ना हि तसबीर
जलतरंगा सोबत लहरणारी

पाण्या सारखे निर्मळ वाहत
राहता येते का खरच आयुष्यात
अगदी ज्या रंगात मिसळून जावे
अन तरीसुद्धा
जीवन म्हणून आपले अस्तित्व जपावे

उगाच सायंकाळी या तळ्याकाठी
बसतो मी एकटाच मग्न स्वतामध्येच
आणि शोधत राहतो स्वतालाच या खोल डोहामध्ये

खरं तर पाण्यात क्षणात दिसणारे
आणि विरणारे प्रतिबिंब
सांगताय मला कि इतका विचार नको करू
फक्त प्रवाह सोबत वाहत राहा

कारण आयुष्य असाच आहे क्षणभंगुर
मन आनंदी तर प्रतिबिंब हि तसेच दिसेल तुला
अन मग येत राहशील माझ्याकडे तेच पाहायला
न बोलणारा तू अन अबोल मी
सारे काही बोलेल हे प्रतिबिंब
तुला आणि मला जोडणारे

-शीतल
#marathikavita #marathipoem #marathiblogs

No comments:

Post a Comment