गोष्ट माझी साधीच
कथा बिथा नाही हं
सोपीच आहे अगदी
कथा बिथा नाही हं
सोपीच आहे अगदी
आला दिवस माझा म्हणायचे
आणि तो मिळाला याच आनंदात जगायचे
आणि तो मिळाला याच आनंदात जगायचे
पोटापाण्याची सोय आहे म्हणून
नोकरी धंद्याचे झंझट आहे
पण ते आहे म्हणूनच
रोटी कपडा मकान हि आहे
नोकरी धंद्याचे झंझट आहे
पण ते आहे म्हणूनच
रोटी कपडा मकान हि आहे
रंग दिसतात मला
सूर ऐकू येतात मला
शब्द गळ्यातून उमटतात माझ्या
हात पाय जागच्या जागी
अन डोके सुद्धा आहे बरं
अगदी जागच्या जागी
सूर ऐकू येतात मला
शब्द गळ्यातून उमटतात माझ्या
हात पाय जागच्या जागी
अन डोके सुद्धा आहे बरं
अगदी जागच्या जागी
प्रेम करणारी आपली अशी
थोडीच का होईना माणसे आहेत आजूबाजूला
रसिक कुटुंबाचा सहवास आहे
या साऱ्यांच्या साथीला
थोडीच का होईना माणसे आहेत आजूबाजूला
रसिक कुटुंबाचा सहवास आहे
या साऱ्यांच्या साथीला
अजून काय लागत हो
थोडेसे का होईना
हसू ओठावर सजवायला
अन थोडे हसू आजूबाजूला वाटायला
थोडेसे का होईना
हसू ओठावर सजवायला
अन थोडे हसू आजूबाजूला वाटायला
कटकटी, भांडणे, ट्रॅफिक, गर्दी
खोकला ताप व्हायरल अन सर्दी
प्रदूषण राजकारण
अन आवाजाची कलकल
रोजचच कि सारे माझ्या तुमच्या आयुष्यात
म्हणून का अडकून पडायचे त्याच त्याच चक्रव्यूहात
खोकला ताप व्हायरल अन सर्दी
प्रदूषण राजकारण
अन आवाजाची कलकल
रोजचच कि सारे माझ्या तुमच्या आयुष्यात
म्हणून का अडकून पडायचे त्याच त्याच चक्रव्यूहात
अगदीच काही माझी ओंजळ नाही रिती
रोज उठून उद्या काय याची पोटी नाही भीती
रोज उठून उद्या काय याची पोटी नाही भीती
मी-माझ्यातून बाहेर पडले
कि आजूबाजूचा संघर्ष दिसतो
रोजच्या जगण्याचा त्यांचा
जे झगडतात रोज जगण्यासाठी
अन मग त्याच्या जगण्याची, कथा होते
अन माझी गोष्ट साधीच आहे
याची मला जाणीव होते
- शीतल
#marathikavita #marathipoem #marathipoetry #Blogs #marathiblogs #sheetaljoshi
कि आजूबाजूचा संघर्ष दिसतो
रोजच्या जगण्याचा त्यांचा
जे झगडतात रोज जगण्यासाठी
अन मग त्याच्या जगण्याची, कथा होते
अन माझी गोष्ट साधीच आहे
याची मला जाणीव होते
- शीतल
#marathikavita #marathipoem #marathipoetry #Blogs #marathiblogs #sheetaljoshi
No comments:
Post a Comment