बऱ्याच दिवसात काही लिहिलच नाही
कस बर लिहिणार, लिहायला काही सुचलच नाही
सुचण्यासाठी काही तरी घडावं लागतं
झाडच एखादे पण तरी गळावे लागतं
अचानक पावसानी गाठावे लागतं
कुणीतरी कुणाच्या तरी प्रेमात तरी पडावे लागतं
आजू बाजूला बराच काही दिसत असते
म्हंटले तर बराच काही घडत असते
कधी मोर्चे, तोड फोड, काही नाही तरी ट्राफिक जाम
कारण कुणाचे तरी काही तरी अडत असते
आणि म्हणूनच हे सारे हि घडत असते
मग का बर आपल्याला काही सुद्धा सुचत नाही
आजू बाजूला काय चाललय तेच मुली काळात नाही
आणि कळले तर जर सुद्धा वळत नाही
या सगळ्या गोंधळात सारे शब्दच जणू हरवलेत
डोळ्या देखत काय माहित सारे कुणी पळवलेत
सृजनशी त्यांचे नाते जणू काही विसरलेत
किती जरी शोधले तरी शब्द काही मिळत नाहीत
कसे बरे लिहावे हे सारे तेच आता काळात नाही
म्हणूनच, म्हणूनच
बऱ्याच दिवसात काही सुद्धा लिहिले नाही
मनात खूप असले तरी, मुळीच काही सुचले नाही
- शीतल जोशी
No comments:
Post a Comment