कृष्ण सखा
अर्जुन झालाय माझा
म्हणून कृष्ण शोधतोय मी एक
एक सखा जो परखड असेल
जो खंबीर पणे उभा राहील
माझ्या संकटात माझ्या समवेत
माझा आनंद त्याच्या हास्यात उमटेल
आणि माझे दु:ख त्याच्या बासरीच्या सुरात उमटेल
त्याच्यात आणि माझ्यात अंतर असेल कैक मैलांचे
पण तरीही तो गाठेल हे अंतर प्रकाश वेगाने
मला नको आहे देवत्वाचा अंश असणारा कृष्ण
न मला त्याची पूजा करायची आहे, संकटे येवूच नयेत म्हणून
मला तो केवळ एक सुहृद म्हणून हवाय , ज्याचा मीही एक मित्र होवू शकेन
मला जो केवळ योग्य मार्ग दाखवेल आणि कधी गरज पडलीच तर माझी मैत्री हि पाराखेल
सापडेल का असा तो कृष्ण सखा
कि आहेच इथे कुठेतरी , दिसून न दिसल्या सारखा
कदाचित माझ्यातच कुठे तरी
केवळ मी मनापासून साद घालायची वाट पाहतोय
माझा कृष्ण सखा , माझ्याच मनातला
- शीतल

No comments:
Post a Comment