शोधत राहते मी स्वतःला
नव्याने पुन्हा एकदा
माझ्या दुःखाच्या सावल्या
मोठ्या होतात माझ्या पेक्षा
नव्याने पुन्हा एकदा
माझ्या दुःखाच्या सावल्या
मोठ्या होतात माझ्या पेक्षा
मग मीच थोड़ी मोठी होते
मनाची कवाडे खोलते
अजुबाजूचे असंख्य पोरके जीव दिसतात
अन त्यातले किती तरी चक्क हसत हसत जगत असतात
मनाची कवाडे खोलते
अजुबाजूचे असंख्य पोरके जीव दिसतात
अन त्यातले किती तरी चक्क हसत हसत जगत असतात
दुःख मनात असले तरी
त्याची बोच कमी होते
सावली हळू हळू छोटी होते
माझ्यात ती अन तिच्यात मी
सगळे विसरून एकरूप होते
त्याची बोच कमी होते
सावली हळू हळू छोटी होते
माझ्यात ती अन तिच्यात मी
सगळे विसरून एकरूप होते
-शीतल
No comments:
Post a Comment