Wednesday, 30 September 2015

मैत्री कशासाठी



मैत्री कशासाठी, तर मैत्री अश्यासाठी !!!!


मैत्रीचा पाऊस, सुखाची बरसात करण्यासाठी

मैत्रीची सावली, थकल्या जीवाला गारवा देण्यासाठी

मैत्रीची ऊब, गोठलेल्या आकांक्षा चेतवण्यासाठी

मैत्रीचा आधार, मुळातच न उन्मळण्यासाठी

मैत्रीची साथ, आयुष्यभर, सोबत करण्यासाठी

मैत्रीचा हात, संकटा मध्ये घट्ट धरण्यसाठी

अन मैत्रीचे हे अतूट नाते, जगण्यालाच अर्थ देण्यासाठी
- शीतल



No comments:

Post a Comment