Tuesday, 29 September 2015

तू जणू

तू जणू

तू जणू एक स्वप्न, मी पाहिलेले
सत्य कि आभास, माझ्या मनाचे खेळ
कि माझ्या जगण्याचा श्वास

तू जणू इंद्रधनू
सप्तरंगाची उधळण करणारे
तू जणू एक आकाश
धरतीला हि कवेत घेणारे

तू जणू अथांग सागर
कधी रुद्र तर कधी शांत
कधी सरितेला सामावून घेणारा
तर कधी किनार्याला हि दूर लोटणारा

तू जणू श्रावण मास रिमझिम रिमझिम बरसणारा
मायेच्या ओलाव्याने आषाढ सर हि चिंब करणारा

तू माझा जिवलग सखा
राधेचा कृष्ण जसा
तू माझा प्राण सखा
मीरेचा तू ध्यास जसा

- शीतल

No comments:

Post a Comment