Wednesday, 30 September 2015

मैत्री:कैरी सारखी

मैत्री

मैत्री असते,
हिरव्या कच्च्या, आंबट चिंबट कैरी सारखी
केव्हाही, कधी हि, हवी हवीशी वाटणारी
वर्ष भर या न त्या रुपात भेटणारी

तिला मिळवण्यासाठी खूप खटपटी कराव्या लागतात
प्रसंगी थोड्याशा इजा हे सहाव्या लागतात
तरी सुद्धा बर्याचदा ती काही गवसत नाही
आणि आपल्याला हि तिच्या शिवाय राहवत नाही

आपण तिला विचारतो
" काय ग झाले हसायला?"
ती उत्तर छान देते,
"वेळ तरी दे पिकायला'

मैत्री हि अशीच , कैरीसारखी
खूप खूप पिकल्याशिवाय  त्यात "गोडवा" उतरत नाही

मैत्री हि अशीच इवल्य्श्या रोपट्या सारखी
वर्ष मागून वर्षे सरल्यशिवाय, त्याचा " गारवा" काही मिळत नाही
-शीतल

No comments:

Post a Comment