हिरव्या गार वनराई मधून
दिशाहीन चालताना
अन माणसांच्या गर्दी मध्ये
आपले अस्तित्व शोधताना
काय बरे फरक आहे ?
शांत सागर किनाऱ्यावर,
उसळणाऱ्या अनंत लाटा झेलताना
अन कोसळणाऱ्या झऱ्याखाली
मनसोक्त भिजताना
काय बरे फरक आहे ?
रणरणत्या उन्हामध्ये
सावली चा शोध करताना
अन खोल खोल विचारामध्ये
स्वतःच्या मनाचा वेध घेताना
काय बरे फरक आहे ?
धकाधकीच्या आयुष्यामधून
हसण्याचे क्षण जमवताना
अन रुसलेल्या डोळ्यांमध्ये
थोडे प्रेम साठवताना
काय बरे फरक आहे ?
निळ्या शार आभाळामध्ये
उंच उंच जाताना
अन इवल्याश्या पापण्यावर
असंख्य स्वप्ने जपताना
काय बरे फरक आहे?
पहाटेच्या वेळी , केशरी क्षणासोबत
आरक्त रंगात रंगताना
अन रात्रीच्या काळोखात
चांदण्यातून झिरपताना
काय बरे फरक आहे ?
कल्पनेचेच खेळ सारे
फरक कसला आहे बरे त्यात
शोधले तर सापडते सुख
अन मानला तर आनंद आहेच साऱ्यात
- शीतल
दिशाहीन चालताना
अन माणसांच्या गर्दी मध्ये
आपले अस्तित्व शोधताना
काय बरे फरक आहे ?
शांत सागर किनाऱ्यावर,
उसळणाऱ्या अनंत लाटा झेलताना
अन कोसळणाऱ्या झऱ्याखाली
मनसोक्त भिजताना
काय बरे फरक आहे ?
रणरणत्या उन्हामध्ये
सावली चा शोध करताना
अन खोल खोल विचारामध्ये
स्वतःच्या मनाचा वेध घेताना
काय बरे फरक आहे ?
धकाधकीच्या आयुष्यामधून
हसण्याचे क्षण जमवताना
अन रुसलेल्या डोळ्यांमध्ये
थोडे प्रेम साठवताना
काय बरे फरक आहे ?
निळ्या शार आभाळामध्ये
उंच उंच जाताना
अन इवल्याश्या पापण्यावर
असंख्य स्वप्ने जपताना
काय बरे फरक आहे?
पहाटेच्या वेळी , केशरी क्षणासोबत
आरक्त रंगात रंगताना
अन रात्रीच्या काळोखात
चांदण्यातून झिरपताना
काय बरे फरक आहे ?
कल्पनेचेच खेळ सारे
फरक कसला आहे बरे त्यात
शोधले तर सापडते सुख
अन मानला तर आनंद आहेच साऱ्यात
- शीतल
No comments:
Post a Comment