प्रेमात हे असेच असते का?
सोनेरी पहाट, सोनेरी उन्हात, तुझ्या साथीचे सोनेरी स्वप्न
आणि तुझा हवाहवासा वाटणारा श्वास
सकाळची धावपळ, कामाची कटकट
आणि त्यातच सुखावून जाणारा तुझा आभास
संध्याकाळचा गारवा, रंगांची उधळण करणारे आकाश
आणि मनात दाटलेली हुरहूर
रात्रीचा काळोख चांदण्याचा मंद प्रकाश
आणि तुझ्या विरहाने मनात उठलेले काहूर
प्रेमात हे असेच असते का?
सतत अवती भवति मीच असावे असे तुला हि वाटते का?
जवळ नसताना ही असल्याचा भास
आणि जवळ असून ही दूर जायच्या कल्पनेनीच होणारा त्रास
कधी तुझ्या आठवणीने ओलावणारे डोळे
अन कधी तुझ्या आठवणीनेच सावरणारे मन
तुझ्या भोवतीच विणलेले नात्याचे रेशिमजाळे
आणि तुझ्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण
- शीतल जोशी
No comments:
Post a Comment