Wednesday, 7 October 2015

तुझ्या साठी- तुझ्या विना




तुझ्या साठी- तुझ्या विना

कळले न कधी
जुळले सूर हे
झाले मन वेडे
तुझ्या साठी आतुर  हे

तुझ्याविना भासे सुना सुना
हर एक क्षण मला
तुझ्या विना जणू
प्राजक्त कोमेजला

तू असता समोर
नजर खाली वळे अन शब्द ना सुचती मला
तू नसता जवळ
नयन  का शोधी तुला

स्वप्न वेडी ना मी
तरी हि रमते तुझ्याच ध्यासात
जरी चित्रकार न मी
तरी रेखिते तुझे चित्र  मनात

मन हळवे झाले
तुझे आठव मनी दाटता
डोळे भरून आले
तुझी स्मृती जागता

तुझ्या सवे  असताना
झंकारले सप्तसूर मनी
जाहले मी तुझी
अश्या ह्या  भारल्या क्षणी

कळले न मला
न कळले  अन तुला
प्रीतीचे बोल हे
अंतरी रुजले कसे

कळले न कधी
जुळले सूर हे
झाले मन वेडे
तुझ्या साठी आतुर  हे

-शीतल

















No comments:

Post a Comment