नव्या वर्षाचा पहिलाच सण
घेवून आला आनंदाचे क्षण
गुढी उभारता चैतन्याची
नव्या वर्षाचा उन्मेष बहरला
चैत्र मास दारी येता,
दाही दिशा उजळून आल्या
रंगबेरंगी फुलांच्या सवे ,
आसमंत सारा भरुनी गेला
चैत्रा मधले रस विविध
जणू आयुष्याचे रूपाच ते
थोडे कडू निम्बाचे पान अन
थोडी मधुरता साखर पारीची असते
जशी चैत्रमधली पालवी
एक नवी ओळख सृष्टीला देते
तशी एक नवी ओळख
आपली आपल्यास लाभो
नव्या वर्षाच्या प्रथम दिनी
इतका संकल्प तरी मनी दृढ होवो
- शीतल
No comments:
Post a Comment